सोंगटी (नाम)
बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
सिंह (नाम)
बारा राशींपैकी पाचवी रास ज्यात मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण व उत्तरा फाल्गुनीचे प्रथम चरण आहे.
बगळा (नाम)
मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
धन (विशेषण)
धन बाजूशी संबंधित.
नियम (नाम)
योगाच्या अष्टांगापैकी दुसरे अंग.
सूर्य (नाम)
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
तख्त (नाम)
राजाचे बसावयाचे आसन.
जास्वंद (नाम)
ज्या झाडाचे फूल गणपतीचे आवडते फूल म्हणून ओळखले जाते असे एक सदापर्णी, बहुवर्षायू झाड.
पिंजरा (नाम)
पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
गोळा (नाम)
दारू, खिळे इत्यादी घातलेली तोफेतून उडवण्याची मोठी गोलाकार स्फोटक वस्तू.