छत (नाम)
सिमेंट, रेती इत्यादींनी बनवलेले घराचे वरचे आच्छादन.
हिरा (नाम)
अत्यंत कठीण, देदीप्यमान व मौल्यवान असा एक खडा.
बगळा (नाम)
मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
सूर्य (नाम)
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
थोरला भाऊ (नाम)
आधी जन्मलेला भाऊ.
आक्रमण (नाम)
मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.
हस्तक्षेप (नाम)
एखाद्याच्या चालू कामात मधे येऊन काहीतरी बदल करण्याची क्रिया.
वंचित (विशेषण)
एखादी वस्तू, गोष्ट इत्यादी न लाभलेला.
भूषण (नाम)
मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू.
देठ (नाम)
फळ, फूल वगैरेचा दांडा.