चंद्र (नाम)
आकाशात दिसणारा, पृथ्वीभोवती फिरणारा तिचा एकमात्र उपग्रह.
जाई (नाम)
एक फुलवेल जिला पांढरी सुगंधित फुले येतात.
इंद्र (नाम)
देवांचा,स्वर्गाचा व पूर्वदिशेचा अधिपती.
खेद (नाम)
आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.
शंका (नाम)
एखाद्या गोष्टीविषयी निश्चितपणे सांगता, जाणता, ठरवता येत नाही अशी स्थिती.
ताकीद (नाम)
सक्तीचा हुकूम.
शेतकरी (नाम)
शेती करणारा मनुष्य.
वाघ (नाम)
मार्जारकुळातील एक हिंसक प्राणी.
वृक्ष (नाम)
मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
रोडावलेला (विशेषण)
हाडे निघालेला वा बाहेर आलेला.