विडी (नाम)
ओढण्यासाठी तंबाखू घालून केलेली पानाची सुरळी.
हाकलणे (क्रियापद)
पद, स्थान इत्यादींपासून दूर करणे.
ढोली (नाम)
झाडाचे खोड, फांद्या इत्यादीमध्ये तयार झालेला पोकळ भाग.
चिन्ह (नाम)
जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो.
बाजूबंद (नाम)
दंडाला बांधायचा एक दागिना.
मैना (नाम)
पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.
इंद्र (नाम)
देवांचा,स्वर्गाचा व पूर्वदिशेचा अधिपती.
यजमानीण (नाम)
यज्ञकर्म करणार्याची (यजमानाची) पत्नी.
ब्रह्मचारी (नाम)
स्त्रीसंगपरित्यागाचे व्रत आजन्म किंवा काही काळपर्यंत पाळणारा मनुष्य.
डच्चू (नाम)
शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.