शेकोटी (नाम)
थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून केलेला गवत,वाळक्या काटक्या,पाने इत्यादींचा विस्तव.
वेडपट (नाम)
जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.
कारकीर्द (नाम)
एखाद्या अधिकारपदावर राहून राज्य करण्याचा वा एखाद्या क्षेत्रात सक्रिय असण्याचा कालावधी.
सडाफटिंग (विशेषण)
कुटुंब नसलेला.
पंख (नाम)
पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.
वित्त (नाम)
सोने,चांदी,रुपये इत्यादी.
धन (नाम)
सोने,चांदी,रुपये इत्यादी.
उपहास (नाम)
हसून एखाद्याची निंदा करण्याची क्रिया.
कामकाज (नाम)
सामान्यतः कोणताही व्यवहार.
प्रेयसी (नाम)
जिच्यावर प्रेम आहे ती.