अर्थ : आकाशमार्गे गमन करणे.
उदाहरणे :
पिंजर्याचे दार उघडताच पाखरे आकाशात उडाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आकाश मार्ग से या हवा में होकर एक स्थान से दूसरे स्थान पर जाना।
हवाई जहाज़ समुद्र के ऊपर से उड़ रहा था।अर्थ : झटका किंवा धक्का लागल्यावर काही वेगाने बाहेर येणे.
उदाहरणे :
गवळणीच्या डोक्यावर ठेवलेल्या बादलीतून पानी उडत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हवेत वर-वर जाणे.
उदाहरणे :
मकरसंक्रांतीला आकाशात खूप पतंगी उडताना दिसतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आघात इत्यादींमुळे वर वा बाजूला जाणे.
उदाहरणे :
पावसाळ्यात रस्त्याने चालताना चिखल फार उडतो.
अर्थ : एखाद्याच्या बळावर, आशेवर काम करणे.
उदाहरणे :
तू कुणाच्या जिवावर इतका उडतोस?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या ठिकाणी स्थिर न होणे.
उदाहरणे :
त्याचे मन अभ्यासातून उडाले.
अर्थ : चकित किंवा अत्याधिक प्रसन्न होण्याची दशा किंवा आवेश इत्यादीमुळे शरीर किंवा त्याचे अंग वर उठणे.
उदाहरणे :
खोलीत साप पाहून तो तर उडालाच.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : उडण्याची क्रिया.
उदाहरणे :
काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :