दाट (विशेषण)
ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
विपर्यास (नाम)
उलट अर्थ घेण्याची क्रिया.
शंका (नाम)
एखाद्या गोष्टीविषयी निश्चितपणे सांगता, जाणता, ठरवता येत नाही अशी स्थिती.
अनिश्चितता (नाम)
एखादी गोष्ट निश्चित नसण्याची अवस्था.
धुके (नाम)
जमिनीवर येणारे पातळ अभ्र.
निष्ठावंत (विशेषण)
एखाद्याविषयी निष्ठा, श्रद्धा किंवा भक्ती असणारा.
उशीर (नाम)
ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
सूर्य (नाम)
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
व्याकूळ (विशेषण)
शारीरिक, मानसिक वेदनांनी पीडित झालेला.
बगळा (नाम)
मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.